अमरावती

तृतीय पंथीयांना लाडली बहीण योजनेचा लाभ द्या काँग्रेस नेत्या आ. यशोमती ठाकूर यांची मागणी..

अमरावती… मुख्यमंत्र्यांची महत्त्वकांक्षी योजना असलेली लाडली बहीण योजनेचा लाभ तृतीय पंथीयांना देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. महिला धोरण झाल्यानंतर तृतीय पंथांचे धोरण होणं सुद्धा गरजेचं होतं, मात्र ते झालं नाही. त्यामुळे लाडली बहीण योजनेचा जो काही लाभ इतर महिलांना मिळत आहे, तोच लाभ तृतीय पंथीयांना सुद्धा मिळावा, यासाठी आमदार यशोमती ठाकुर यांनी..

सभागृहात आवाज उचलला होता, मात्र सरकारकडून अजून पर्यंत कोणताही याबाबत सकारात्मक निर्णय, आलेला नाही. त्यासोबत एसटी बस मध्ये इतर महिलांप्रमाणे तृतीया पंथीयांना 50 टक्के सूट देण्यात यावी , व सरकारने तृथीय पंथांकडे लक्ष द्यावं व त्यांचे सुद्धा राहणीमान वाढावे, सुधारावे..अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!