कृषीजळगांव जामोदबुलढाणा

सुनगाव येथील शेतकऱ्याने केली, सफेद मुसली ची लागवड..

शेतकऱ्यांसाठी ठरणार हा एक प्रेरणादायी प्रयोग..

बुलढाणा जिल्ह्यात, जळगांव जामोद तालुक्यात सूनगांव येथील शेतकरी, विजय शत्रुघ्न वंडाळे हे त्यांच्या शेतात मागील वीस वर्षांपासून  सफेद मूसळी ची लागवड करतात, ही अत्यंत गुणकारी व औषध निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण घटक असलेली अशी आरोग्यदायी व अनेक उपयोगी असलेली अशी औषधी वनस्पती  असून, सफेद मुसळी ची लागवड हे सुनगाव परिसरात केल्या जाते ही बाब ह्या परिसरातील लोकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार यात शंका नाही.

यावेळी त्यांनी, दिनांक 29 मे रोजी, आपल्या शेतात सफेद मूसली ची लागवड केली आहे. शेतात सफेद मुसळी लागवड असो किंवा शेतातील इतरही कुठल्याही कामामध्ये, विजय वंडाळे यांना त्यांची पत्नी सौ. सुनिता विजय वंडाळे यांची समर्थपणे साथ असते. आजकाल लग्न करतेवेळी मुलींच्या आईवडिलांना तसेच मुलींना “वर” मुलाकडे शेती असली पाहिजे अशी अपेक्षा असते ,पण शेतीत काम करायला नको वाटते. पण सुनीता वंडाले यांच्या सारख्या महिला मात्र नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतातील कष्टाचे कामे करायलाही मागे हटत नाहीत.

विपरीत नैसर्गिक वातावरण असो वा सरकारची शेतकऱ्यांच्या प्रती अनास्था असो, विजय वंडाळे सारखे शेतकरी नेहमी प्रयोगशील शेती करीत राहतात व मानवी आरोग्यास लाभदायी असलेल्या अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीचे उत्पादन करीत असतात. पुर्णपणे नैसर्गिक देखभाल करून सफेद मुसलीचे उत्पादन करणारे वंडाळे दांपत्य ह्यांचे हे कार्य प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी खरोखर प्रेरनादायी आहे, ह्यात तीळमात्र शंका नाही.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!