
*मुंबई..प्रतिनिधी :-*
भाजप आणि शिवसेना उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज संध्याकाळी मुंबईत रोड शो होत आहे. आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून घाटकोपर परिसरातून पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू होणार आहे. त्याआधी नरेंद्र मोदी दिंडोरी च्या केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कपिल पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभांना संबोधित करतील. घाटकोपर येथून संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू होणार व मुलुंड चेकनाकापर्यंत हा रोड शो सुरू राहणार आहे. घाटकोपर परिसर ईशान्य मुंबईत येतो. ईशान्येतून भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा रिंगणात आहेत. मिहीर कोटेचा यांच्या विरोधात शिवसेनेचे ऊबाठा गटाचे संजय दिना पाटील रिंगणात आहेत. ईशान्य मुंबईत दलित आणि गुजराती मतांची टक्केवारी प्रभावी आहे..



