
विदर्भाचे नंदनवन म्हणून अमरावतीच्या चिखलदराची ओळख आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेलं चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदरा हे पर्यटनस्थळ सध्या हिरवाईने नटले आहे. निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक चिखलदरा येथे दाखल झाले आहेत. पर्यटकांची मोठी गर्दी सध्या याठिकाणी पाहायला मिळते आहे.

पावसाळ्यात मेळघाट परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे चिखलदरा मध्ये अल्लादायक वातावरण आहे. चिखलदरा म्हणजे अमरावतीमधील माथेरान आहे. या पर्यटनास्थळावर विविध पॉईंट्स, स्पॉट आहेत. सर्व पॉईंट्स बघत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत आहोत अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी यावेळी दिली आहे…

