कृषीबुलढाणा

महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या भेंडवळ च्या घट मांडणी कडे लागले शेतकऱ्यांचे लक्ष्य..

जळगाव जामोद, प्रतिनिधी :- महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भेंडवळ च्या ह्या बहुचर्चित घटमांडणीत पीक परिस्थिती पाऊस, सामाजिक, आर्थिक, बाजारभाव, तसेच देशाची राजकीय परिस्थिती त्याच बरोबर भौगोलिक, संरक्षण, रोगराई, घुसखोरी अशा विविध विषयाचे ठोकताळे व त्यावर भाकित वर्तवण्यात येते. ही मांडणी अक्षय तृतीया १० मे रोजी संध्याकाळ च्या वेळी केली जाते, तर त्याचे भाकित दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तवण्यात येते. सुमारे ३५० वर्षांपूर्वी चंद्रभान वाघ यांनी या मांडणीस सुरुवात केली. कोरोनाचा काळ सोडला तर आजपर्यंत या मांडणीत खंड पडला नाही. कोरोना काळातही बसस्टँडच्या बाजूच्या जागेवर घरातील लोकांनीच मांडणी केली होती हे विशेष. घटाची अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी मांडणी करण्यात येते. यामध्ये गोलाकार खड्डा खोदून त्या खड्यातील चार ढेकळांवर घागर, त्यावर सांडोळी, कुरडोई, पापड ठेवतात तर, घागरीच्या तळाजवळ पानविडा ठेवतात. या खड्डयाच्या गोलाकार १८ धान्य ठेवतात. अंबाडी, सरकी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, मठ, साळी, जवस, लाख, हरभरा, करडी व मसूर इत्यादी त्यावेळचे प्रचलीत धान्य ठेवतात. पुरी, करंजी, भजी, वडा, सांडोई, कुरडई इत्यादी ठेवत असतात. ही मांडणी केल्यानंतर वाघ परिवारातील सदस्य पूजा करून तेथे दिवा लावून परत येतात. त्यानंतर त्या परिसरात कोणी थांबतही नाही, आणि रात्री कोणी चक्कर ही मारण्यास जात नाहीत. रात्रभर त्या मांडणीवर निसर्गाचा बदल काय घडतो. हवा वारा, उधाण यामुळे घागरीवर ठेवलेले साडोई, कुरडोई, पापडं हे स्थिर राहतात की ते सर्व अस्ताव्यस्त होतात. असा बदल पाहण्यासाठी सकाळीच ५ वाजता सर्व वाघ परिवारातील सदस्य सूर्योदयापूर्वी घटाच्या ठिकाणी येवून प्रथम, निरीक्षण करतात चंद्रभान महाराजांच्या नावाचा जयजयकार करत तो बदल प्रथम टिपुन आपल्या पूर्वीपासून लिहत असलेल्या वहीत प्रथम टिपण करून नंतर उपस्थित जनसमुदायासमोर ते कथन करतात. पारावरही अशीच गुडीपाडव्याला मांडणी करण्यात येते. तिचेही भाकीत ह्या मांडणीच्या भाकीता नंतर सांगितले जाते. या मांडणीसाठी खान्देश, बऱ्हाणपूर, वाशीम विदर्भ असे आणि परिसरातील जनसमुदाय के हजारोंच्या संख्येने विविध जिल्ह्यातून..तालुक्यातून.. गांवखेड्यातून उपस्थित असतात. कृषी संबंधित बी-बियाणे साहित्य यांचे स्टॉल लागतात. त्यामुळे पुढील वर्षातील पीकपाण्याच्या अंदाजाकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सद्या लोकसभेची निवडणूक चालू आहे.. त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील निवडणुका झाल्यावर जून महिन्यात ४ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, भेंडवळ च्या घटमांडणीत देशाच्या राजाच्या गादीबद्दल ही भविष्य..वर्तविण्यात येते..त्यामुळे राजा कायम रहातो की काही बदल होतो, हे पहाण्यासाठी देखील उद्या च्या घटमांडणी वेळी लोकांची जास्तीत जास्त उपस्थिती राहू शकते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!