अमरावती

अमरावती….शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी जेरबंद…9 आरोपीसह 2 लाख 30 हजार रुपये रोख जप्त…

अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक हद्दीतील मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली 75 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. महिलेच्या तक्रारीवरून अमरावती ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास करीत या टोळीतील 9 आरोपींना मुंबई मधून अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून 2 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम, मोबाईल फोन, डेबिट कार्ड, चेक बुक जप्त करण्यात आले आहे. ही टोळी राष्ट्रीय पातळीवर ऍक्टिव्ह असून या टोळीत आणखी सदस्य असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!