
आषाढी एकादशी निमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी करिअर वारीच्या पालखीच स्वागत केलं. “वारी करिअरची दिशा समृद्धीची” या संकल्पनेतून सोलापुरातील कांही होतकरू तरुणांनी, या पालखीच आयोजन केलं आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या, युवकांना ही वारीत सहभागी करता यावं, यासाठी ही अभिनव वारी, सुरु करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी,

करिअर वारीच्या पालखीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेत स्वागत केलं, आणि शुभेच्छा दिल्या. या करिअरच्या वारीचा या आषाढी एकादशीला पंढरपुरात समारोप करण्यात येणार आहे.



