जळगांव जामोदबुलढाणासामाजिक

जळगांव जामोद येथील दुर्गा चौकात लावलेली दुर्गा देवीची..प्रतिमा, काढण्यात आली होती..आता परत ४ जूनला लावण्याचा झाला निर्णय..

*जळगांव जामोद..प्रतिनिधी :-*
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद येथील दुर्गा चौकामध्ये, सुशोभीकरणाचे काम चालू असून, ह्या चौकातील बुरुजावर दुर्गा देवीची प्रतिमा लावण्यात आली होती. काही समाजकंटकांच्या विरोधामुळे प्रशासनानेच ती प्रतिमा काढली..परंतु प्रतिमा काढून हिंदू धर्मियांच्या धार्मिकतेशी छेडछाड करून भावना दुखावल्यामुळे त्याबाबत तात्काळ चौकशी होऊन, आजच्या आज त्या ठिकाणी दुर्गा देवीची प्रतिमा स्थापित करावी, अन्यथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच सकल हिंदू धर्मियांतर्फे ह्या कृत्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा…उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला होता.  निवेदनावर अजय प्रल्हाद वंडाळे, नितीन अरुण काळे, आशिष राजेंद्र सारसर यांच्यासह बऱ्याच जणांनी स्वाक्षऱ्या केल्या..

परंतु हा विषय नगरपरिषद शी संबंधित असल्याने व नगरपरिषद मुख्याधिकारी हे त्यांच्या मतदार संघात मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांच्या मूळगांवी गेले असल्याने, त्यांनी एक दिवसाचा वेळ मागितला होता.. १४ मे रोजी, जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार संजय कुटे..यांच्या उपस्थितीत, नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन ह्यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाजाचे शिष्टमंडळ, यांच्यात, संयुक्त बैठक झाली..व त्यामध्ये लोकसभा.. निवडणूक निकाला दिवशी म्हणजे ४ जूनला आमदार संजय कुटे ह्यांच्या हस्ते, दुर्गा देवीची प्रतिमा दुर्गा चौकात लावण्याचा निर्णय झाला. तरी आता कुणीही दुर्गा देवीच्या प्रतिमे विषयी, कुठल्याही खोट्या अफवांना बळी पडू नये असे, आवाहन करण्यात आले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!