
अकोला, प्रतिनिधी :-
अरुण कुमार वोरा यांचे सोमवारी १३ मे रोजी काही अज्ञात व्यक्तींनी पांढरा रंगाच्या कारमधून रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडी पूल रस्त्यावरून अपहरण केले होते. अरुण वोरा यांचा दगडी पुलाजवळच चारजीन परिसरात काचेच्या रिकाम्या बाटल्यांचा व्यवसाय आहे.
त्यांच्या अपहरणानंतर अकोला शहरात विविध चर्चांना उधाण आले होते. इतर व्यवसायिकांमध्ये सुद्धा दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसानंतरही पोलिसांना काहीच सुगावा लागला नाही. पोलिसांनाही या

घटनेच्या तपासाचे दडपण होते. रामदास पेठ पोलिसांनी… अपहरण झालेल्या अरुण कुमार वोरा यांची माहिती देणाऱ्यास पंचवीस हजारांचे बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले… अखेर… पोलिसांचा तपास जोरात चालू असून पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील अशी भीती वाटून अपहरणकर्त्या आरोपींनी अरुण कुमार वोरा यांना १५ मे च्या रात्री सोडून दिले. त्यानंतर एक वाजता च्या दरम्यान वोरा हे सुरक्षित घरी आले. त्यांना पाहून त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला तसेच पोलिस यंत्रणेवरचा ताण थोडा कमी झाला.
त्यानंतर एल. सी. बी. च्या पथकाने..अपहरणकर्त्यांचा माग काढत सकाळी पाच वाजेपर्यंत, यातील पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. त्यांच्याकडून ह्या गुन्ह्यात वापरलेली कार व मोटरसायकल.. तसेच दोन देशी कट्टे हस्तगत केले असून, हा गुन्हा अपहरण कर्त्यांनी एक कोटी ची खंडणी मागण्यासाठी केला होता, पण वोरा यांचा मोबाईल, अपहरण स्थळावरच पडल्यामुळे आरोपींना, वोरा यांच्या कुटुंबियांना कॉल करता आला नाही..आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती अकोल्याचे एसपी..बच्चनसिंह यांनी दिली..


