जळगांव जामोदबुलढाणा

सुनगांव येथील कोतवाल शालिग्राम ढोले सेवानिवृत्त.. यावेळी करण्यात आला सत्कार…

बुलढाणा जिल्ह्यात, जळगांव जामोद तालुक्यामध्ये सुनगांव येथील भाग २ चे कोतवाल शालिग्राम ढोले हे सेवा जेष्ठतेनुसार निवृत्त.. सुनगांव येथे सर्वसामान्यासह लहान मुलांच्या ही परिचयाचे हे व्यक्तिमत्त्व गेल्या ३० वर्षापासून कोतवाल पदावर कार्यरत होते. शालीग्राम ढोले हे दिनांक ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सुनगांव ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला. यावेळी गावचे ग्रामदैवत श्री आवजी सिद्ध महाराज यांच्या पूजनाने, सत्कारमूर्ती कोतवाल.. शालिग्राम ढोले यांचा सेवानिवृत्ती निमित्त, गावकऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच रामेश्वर अंबडकार हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आसलगांव विभागाचे मंडळ अधिकारी व्ही.एस खेडेकर, व्ही एम शिदे मंडळ अधिकारी जामोद, ग्रामविकास अधिकारी सुनगांव जोशी, तलाठी जीडी वाघ, तलाठी चवरे, तलाठी काळे, पत्रकार गजानन सोनटक्के, कृषीमित्र मोहन सिंह राजपूत, सुनील भगत, तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत हे होते. तसेच या सत्कारा वेळी सुनगांव येथील कोतवाल सचिन कपले, जामोद येथील कोतवाल सुरेश बोबडे, रामेश्वर ठोसर, विष्णू येऊल, दिनेश ढगे, राहुल येऊल यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी मनोगत रामेश्वर ठोसर, कृषीमित्र मोहन सिंह राजपूत, मंडळ अधिकारी खेडेकर, मंडळ अधिकारी शिंदे, ग्रामविकास अधिकारी जोशी यांनी व्यक्त केले. तर आभार तलाठी चवरे यांनी मानले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!