
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांवात मानव प्रगती बुद्ध विहार येथे शौर्य दिनानिमित्त शुरविरांना आणि विजय स्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम दिनांक १ जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आला होता. सर्व प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार गजानन खिरोडकार, गजानन सोनटक्के, अनिल भगत, लक्ष्मण अंदुरकार, रामेश्वर कुनगाडे, किसन अर्दळे, विनोद अंदुरकार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पंचशील ध्वज फडकवुन सामुहिक बुध्द वंदना व त्यानंतर शुरविरांना व विजय स्तंभाला सामुहीक मानवंदना देण्यात आली.. सामुहीक सरणंतेय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचलन अजय अंदुरकार यांनी केले तर आभार राजु अंदुरकार यांनी मानले. यावेळी भिमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा विजयमाला वानखडे यांनी भिमगीतांचे गायन केले. सुनगांव येथील प्रल्हाद भगत, सुनील हिवराळे, भिमराव मगर, सिध्दार्थ सिरसाट, राष्टपाल शिरसाट, संतोष अंदुरकार, राहुल वानखडे, संतोष गाढे, कैलास वानखडे, मनोज अंदुरकार, मिलिंद वानखडे, गणेश अंदुरकार, पवन जाधव, गुणरत्न दामोधर, कडु अंदुरकार,/अक्षय कुनगाडे, दादाराव अंदुरकार, संदेश वानखडे, रोहित अंदुरकार, आदेश वानखडे यांचेसह समस्त उपासक -उपासिका तसेच मिलिंद मित्र मंडळाचे सदस्य मानवंदनेसाठी उपस्थित होते.



