जळगांव जामोदबुलढाणाशैक्षणिक

सुनगांव जिल्हा परिषद शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शनी संपन्न…

बुलढाणा जिल्ह्यात, जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम सुनगांव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक २८ डिसेंबर रोजी एक दिवशीय शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शनी भरविण्याचा अभिनव उपक्रम शाळा स्तरावर पहिल्यांदाच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहकार्याने राबविण्यात आला.. यावेळी भारताचे थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पमाला अर्पण शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे, पत्रकार अनिल भगत शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे सर, उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर धुळे तथा प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अनिल भगत, गजानन सोनटक्के यांची उपस्थिती लाभली. यावेळी पत्रकार अनिल भगत यांचा जिल्हा परिषद मराठी शाळा व उर्दू प्राथमिक शाळा यांच्या वतीने शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. इयत्ता २ ते ८ च्या विद्यार्थ्यांनी अगदी साध्या व छोट्या प्रयोगापासून तर मोठ्या मॉडेल पर्यंत विविध प्रयोगाचे साहित्य बनविले वातावरणीय दाब, दिवस व रात्र होणे, पाणी वितरण यंत्र, हवेचा दाब, जलचक्र, प्रदूषणाचे दुष्परिणाम, स्मोक एबसाँर्बर, ज्वालामुखीचा उद्रेक जादूचा पाळणा अशी उपकरणे या विज्ञान प्रदर्शनीत सादर केली. अतिशय आनंदी उत्साही वातावरणात विज्ञान प्रदर्शनी भरविण्यात आली. विज्ञान विषयक शिक्षक प्रदीप वाकेकर यांच्या विशेष पुढाकाराने तथा सर्व वर्ग शिक्षकांच्या मदतीने विज्ञान प्रदर्शनी चा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे सर, उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर सर, बेग सर, प्रदीप वाकेकर सर, अंबडकार सर, अस्मिता क्षिरसागर, साबे मॅडम, बोंबटकार मॅडम, गवई मॅडम, उमाळे मॅडम, कर्मचारी मनोहर वानखडे राजु अंदुरकार यांच्या अथक परिश्रमाने विज्ञान प्रदर्शनी चा हा उपक्रम पार पडला. यावेळी सत्कारदरम्यान पत्रकार अनिल भगत यांनी शाळा समिती अध्यक्ष व दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे सर, शेख मजहर सर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे यावेळी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!