जळगांव जामोदबुलढाणा

मातोश्री नथियाबाई विद्यालयात कौशल्य विकास मार्गदर्शन सत्र संपन्न…

बुलढाणा जिल्ह्यात, जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे विद्याभारती शैक्षणिक मंडळ द्वारा संचलित मातोश्री नथियाबाई विद्यालयात, दिनांक १३ डिसेंबर रोजी वर्ग ९ व १० च्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य विकास सत्र, आयोजित करण्यात आले होते. या सत्राला जळगांव जामोद येथील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यापक हवालदार सर व प्राध्यापक एपी ताळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके हे होते. व्यासपीठावर एस डब्ल्यू इंगळे यांची उपस्थिती होती. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव जामोद चे प्राध्यापक.. हवालदार यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच औद्योगिक शिक्षण घेतल्याने स्वतःचे व्यवसाय तसेच इतर ठिकाणी नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यवसायिक व औद्योगिक ज्ञान कसे देता येईल याचा विचार केला जातो तसेच या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यावर भर दिला जातो. पुस्तकी ज्ञान खूप कमी प्रमाणात दिले जाते. ITI अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या संधी देखील उपलब्ध आहेत. विद्यार्थी टेक्निशियन किंवा नॉन टेक्निशियन म्हणून देखील वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करू शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो तसेच विद्यार्थ्यांना थेरी नॉलेज देण्यापेक्षा प्रॅक्टिकली जास्त माहिती या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पुरवली जाते आणि म्हणूनच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील उघडू शकतात.. तसेच व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची इन्कम वाढवू शकतात जसे की हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिशियन फिटर, टेक्निशियन, शिवणकाम, डिझाईनिंग, संगणक तंत्रज्ञान, हार्डवेअर, नेटवर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी स्वतःचे नशीब आजमावू शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेक्टर तसेच गव्हर्मेंट जॉब मध्ये देखील नोकरी लागण्याची शक्यता असते. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक हवालदार यांनी सांगितले.. यावेळी कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यालयाचे शिक्षक आढाव सर, फोलाने सर, राजपुत मँडम, डिके सर, गवई मॅडम, उमेश पाटील, कुलट सर, लिपिक निखिल धुळे, शाळेचे शिपाई रामेश्वर कुनगाडे, यांच्यासह नववी दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!