जळगांव जामोदबुलढाणा

अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला सीआरपीएफ जवान..

बुलढाणा जिल्ह्यात, जळगांव जामोद शहरातील पंचशील नगर मधील रहिवाशी लोकेश दाभाडे हा वडिलांचे छत्र नसतांना अथक प्रयत्नाने विधवा आईचे स्वप्न पूर्ण करत सीआरपीएफ जवान झाला. कालच लागलेल्या निकालामध्ये त्याचे सिलेक्शन सीआरपीएफ जवान म्हणून झाले.                                          लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले, त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यानंतर आई वर्षाताई दाभाडे यांनी एक मुलगा व एक मुलगी यांचा आपल्या आई-वडिलांच्या सानिध्यात राहून मोलमजुरी करून सांभाळ केला. कालांतराने अंगणवाडीमध्ये सेविका या पदावर त्या कार्यरत झाल्या, मुलांनी सुद्धा जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून शैक्षणिक प्रगती केली. मुलगी बीएससी ऍग्री झाली तर मुलगा आज सीआरपीएफ जवान झाला. लवकरच त्याला जॉइनिंग लेटर मिळेल व तो कर्तव्यावर देश सेवेसाठी रुजू होईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!