जळगांव जामोदबुलढाणा

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभा.. जळगांव जामोद च्या वतीने निवेदन..

परभणी येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगांव जामोद तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत.. महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल तथा मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.
परभणी येथे १० डिसेंबर २०२४ रोजी देशद्रोही समाज कंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केली आहे. या देशद्रोही कृत्याचा दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाज कंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्या नुसार कठोर कारवाई करावी. आणि सीबीआय चौकशी करून यातील मास्टर माईंड चा शोध घेण्यात यावा. तसेच सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकर वाद्याचा मृत्यू झाला आहे, तो पी सी आर मध्ये होता. तेव्हा अमानवी अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी.
तसेच याप्रकरणी परभणी जिल्ह्याचे पोलिस अधिकारी व प्रशासनाला जाग यावी यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध नागरिकांना व्देष भावनेतून अमानुष मारहाण केली आहे. त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी. आणि बौद्ध समाजावर व्देष भावनेतून केले जात असलेले “कोंबिंग ऑपरेशन” त्वरित थांबवावे अशा आशयाचे निवेदन दिले.
सदर निवेदनावर विशाखा सावंगी जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन महीला आघाडी, जगदीश हातेकर तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, अनन्य वानखडे, मधुकर गवई, भास्कर जुमळे, परमेश्वर पारवे, संघपाल गुरचळ, साहेबराव भगत, तानाजी गवळी, महादेव पातोंडे, भीमराव येरवडे, सागर गवळी, रमेश नाईक, द्रोपदा तायडे, आशाबाई तायडे, मंदाबाई तायडे, सुनिता हेलोडे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!