
विद्याभारती शैक्षणिक मंडळ, अमरावती द्वारा संचलित बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील..सुनगांव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालय व इंग्लिश प्रायमरी स्कूल च्या चिमुकल्यांनी

सुनगांव नगरीतील नागरिकांना पंढरीच्या वारीचे दर्शन घडविले. विठू माऊलीच्या पालखी सोहळ्यात, हरिनामाच्या गजरात पालखीतील…

चिमुकले विठुरायाच्या नामाचा जप करीत टाळ मृदुंगासह भक्तिमय वातावरणात नाचत बागडत होती. पालखी थेट निघाली ती थेट ग्रामपंचायत जवळ त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणात नाचत बागडत येथील नागरिकांना पंढरीच्या वारीचे तसेच विठू माऊली चे दर्शन घडविले.

मातोश्री नथियाबाई विद्यालय व इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे सर्वप्रथम विठू माऊलीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ज्योतीताई राजपुत शाळा समिती अध्यक्ष प्रा.डाँ कुलदीपसिंह राजपूत, मुख्याध्यापक शिवदास सोळंके, विनोद अंदुरकार, अर्जुन ढगे, पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत यांचे मातोश्री मध्ये विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत समोर सरपंच रामेश्वर अंबडकार, तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत, यांनी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
विद्यालयाच्या आवारामध्ये चिमुकल्यांचा रिंगण सोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. तसेच यावेळी चिमुकले टाळ मृदुंगासह विठू माऊलीचा जयघोष करीत होते. ग्रामपंचायत समोर तसेच मातोश्री नथियाबाई विद्यालयाला पंढरपूरचे स्वरूप आले होते. यावेळी पालकांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने हा सोहळा पाहायला उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन घोटेकर मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाला राजपूत मॅडम फोलाने सर, डिके सर,अभाव सर, गवई मॅडम निखिल धुळे, तर प्रायमरीच्या ज्योती खवले,मनीषा बानाईत, किरण राजपूत, भगत मॅडम ,निकिता धुळे, रूपाली धुळे, उज्वला धुर्डे, अर्चना मिसाळ, पूजा भगत,वर्षा वंडाळे,आशा वसूलकार, सुवर्णसिंह राजपूत रामेश्वर, कुनगाडे, विशाल वसूलकार यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांसह नागरिकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला.




