गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस.. भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी..

गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. गेल्या दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, आज विविध तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी वातावरण ढगाळ असल्याने पावसाची शक्यता कायम आहे. दरम्यान, भामरागड तालुका शहरात प्रवेश करण्यासाठी असलेला पर्ल कोटा नदीवरील पूल पुरामुळे पाण्याखाली गेला असून त्यामुळे भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा आणि इतर दक्षिण तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. परिसरातील अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला असून पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 22 विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. देसाईगंज तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 137 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात 116.6 मिमी पाऊस झाला आहे.

भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने तेथे बॅरिकेड्स लावण्यात आले असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्पाचे 33 पैकी 27 दरवाजे उघडण्यात आले असून तेथून 3 हजार 33 क्युमेक पाणी सोडण्यात येत आहे, तर तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा बॅरेजमधून 10 हजार 576 क्युमेक पाणी सोडण्यात येत आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग पाच हजार क्युमेकने वाढणार असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अचानक पुराचा इशारा देण्यात आला आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!