महाराष्ट्र

पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता AI मार्फत नजर..

पुणे शहरातील वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पुणे पोलिसांकडून एआय (Artificial Intelligence) आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणालीच्या प्रायोगिक चाचणीस काल सायंकाळी फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेल समोर प्रारंभ करण्यात येणार आहे. या प्रणालीचा उद्देश म्हणजे, शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई अधिक अचूक आणि कार्यक्षमपणे करणे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वाहतूक कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग ओळखणे, त्याची नोंद ठेवणे. आणि थेट दंड आकारणे अशा प्रकारचा तंत्रज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन यातून अमलात आणला जाणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग)  मनोज पाटील, तसेच पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर वाहतूक उल्लंघनास त्वरित प्रतिसाद देणे, वेळेत दंड आकारणी करणे, आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. शहरातील वाहतूक समस्या सुटाव्यात आणि अपघातांमध्ये घट होण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!