महाराष्ट्रराजकीय

भारत पाकिस्तानचा बाप आहे – माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे..

जालना शहरांमध्ये सर्वपक्षीय व सर्व नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी बोलताना माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, पहेलगाम येथे आमच्या निष्पाप पर्यटकांना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी ठार केले. याचा बदला आमच्या भारतीय सैनिकांनी त्यांच्या हद्दीत घुसून घेतला आहे. व भारताने पुन्हा पाकिस्तानला गुडघ्यावर आणले आहे. त्यामुळे भारतच पाकिस्तानचा बाप आहे..असे वक्तव्य यावेळी त्यांनी आपल्या गावरान शैली मध्ये केले आहे, तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, विरोधक विनाकारण राजकारण करत आहे. राजकारण आम्ही करत नाही, तिरंगा रॅली काढली, ही रॅली आम्ही भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ काढली आहे. व कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचे आम्ही राजकारण करत नाही. राजकारण तर खरं विरोधक करत आहे, असा टोला सुद्धा यावेळी त्यांनी विरोधकांना लगावला आहे. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!