जळगांव जामोदबुलढाणाविदर्भ

वादळी वाऱ्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांचे नुकसान..

वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी.. नागरिकांची दुर्दशा..

जळगाव जा. प्रतिनिधी :-
पुन्हा काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावांना ह्याचा फटका बसला असून, त्यामध्ये सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन, जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले, तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे ही उन्मळून पडली. काहींच्या घरांची पडझड झाली, तर काहींच्या घरावरची टिनपत्रे उडाली. उन्हाच्या दाहकतेत वाढ होऊन मानवी तसेच पशूंच्या ही आरोग्यावर ह्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले.
आर्थिक नुकसान किती झाले, याचा अंदाज सर्वे नंतर स्पष्ट होईल. आसलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील छत उडून गेल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या तूर, मका, व इतरही जीवनावश्यक धान्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आसलगाव बाजार बंद राहील अशी माहिती बाजार समितीने दिली आहे. आसलगाव, पिंपरी खोद्री, पिंपळगाव काळे, खांडवी या परिसरात वादळामुळे खूपच नुकसान झाले आहे. याचा सर्वे शासन स्तरावर करण्याचे आदेश आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याप्रसंगी आमदार डॉ. संजय कुटे यांचे आवाहन.. नागरिकांनी प्रशासनातील अधिकारि, कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे …
जळगांव जामोद तालुक्यात काल आलेल्या वादळा मूळे.. आसलगांव, खांडवी, सुलज, पलशीसुपो, झाड़ेगांव, मानेगांव, गोळेगांव आणि कुरनगाड या गावासह इतर काही गावातील अनेक नागरिकांच्या घरावरिल टिनपत्रे उडून, मोठे नुकसान झाले होते. या बाबत प्रशासनातील जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता विज कंपनी, उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांचेशी संपर्क करुण योग्य त्या सुचना रात्रीच दिल्या होत्या. त्यानुसार आज सर्व पंचनामे पुर्ण झाले असुन आसलगांव आणि पिंपळगांव काळे ३३ KV संध्याकाळ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहेत, तर पुढ़ील ४/५ दिवसात गावठान फ़ीडर पण पुर्ववत् करन्यात येईंल. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनातील अधिकारी व कर्मचऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जळगांव जामोद मतदार संघाचे आ. डॉ. संजय कुटे ह्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!