घटनाजळगांव जामोदबुलढाणा

सुनगांव च्या नवविवाहित तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू…

जळगांव जामोद प्रतिनिधी :-
जळगांव जामोद तालुक्यात असलेल्या, सुनगांव येथील तरुणाचा संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे, आपल्या दुकानात काम करत असताना सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक २१ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुनगांव येथील संदीप शेषराव तेटू या तरुणाचा विवाह नुकताच ५ मे रोजी गावातीलच वैष्णवी नामक मुलीसोबत सोबत पार पडला. लग्नाला फक्त पंधरा दिवस होत असताना काळाने क्रूर थट्टा केली. काल २१ मे रोजी त्याच्या स्वतःच्या कलरच्या दुकानात गेला असता, व दुकानात काम करीत असताना त्याला अचानक सापाने दंश केला. त्याला स्थानिकांच्या मदतीने ताबडतोब उपचारासाठी शेगांव येथे नेत असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संदीप या तरुणाचे नुकतेच पंधरा दिवसापूर्वी लग्न झाले होते. त्याच्या परिवारावर व सुनगांवावर शोककळा पसरली होती. संदीप याच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी गावात पसरताच गावातील नागरिक शोकाकुल झाले. संदीप हा सर्व गावातील नागरिकांच्या परिचयाचा होता, तसेच तो मनमिळाऊ स्वभावाचा शांत, संयमी म्हणून सर्वांना परिचित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!