
अकोला, प्रतिनिधी :- मिळालेल्या माहितीनुसार, अकोला बाळापूर रोडवर असलेल्या एबीसी मार्केटसमोर 28 मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एसटी महामंडळाच्या बसने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल स्वारास चिरडले, या घटनेत मोटारसायकल चालवत असलेले प्रकाश वामन पाचंगे (वय 50, रा. शिवसेना वसाहत, अकोला) ह्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती जुना शहर पोलिसांना देताच जुना शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले व मृतदेहाचा पंचनामा करून ..मृतदेह..शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला.



