महाराष्ट्र

जालन्यात वाळू माफियांकडून तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न..

जालना जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. अंबड तालुक्यातील शहागड परिसरात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळूमाफियाकडुन थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाला. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी चक्क हवेत गोळीबार करावा लागला. तहसीलदार चव्हाण यांनी ४ राऊंड फायर केले. आरोपी घटना स्थळावरून फरार झाले. आरोपींचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात चार अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!