
वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार, राष्ट्रीय स्तरावरील बातम्यांमध्ये स्थान मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात अचानक केस आणि हाता.. पायावरील नख गळण्याच्या घटना पंजाब आणि हरियाणा येथून येणाऱ्या व स्थानिक रेशन दुकानांमधून पुरवल्या जाणाऱ्या गव्हात आढळणाऱ्या, उच्च सेलेनियम घटकाशी संबंधित असल्याचा संशय असून, आज मंगळवारी शासनाच्या पथकाने शेगाव.. खामगाव रोडवरील वरखेड फाट्याजवळ असलेल्या शासकीय गोडाऊन मध्ये पोहोचून रेशनच्या गव्हाचे नमुने सील करून ताब्यात घेतले आहे.



डिसेंबर २०२४ ते या वर्षी आतापर्यंत बुलढाण्यातील १८ गावांमध्ये ५०० व्यक्तींमध्ये अचानक केस गळणे किंवा ‘अॅक्युट ऑनसेट अलोपेशिया टोटालिस’ची प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान आता याच गावांमधील काही रुग्णांच्या हातापायावरील नखं उखडू लागली आहेत. हा आकडा आता ५२ पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता प्रशासन खडबडून जागे झाले असून आज सकाळपासून दिल्ली व मुंबई येथील आरोग्य पथक..बाधित गावांमध्ये पोहोचलेले आहेत. दरम्यान एका पथकाने रेशनच्या गव्हाचे वितरण होणाऱ्या गोडाऊनमध्ये भेट देऊन तेथील नमुने ताब्यात घेतले आहे.



