बुलढाणामलकापूर

मलकापूर-नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ आंध्रप्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रकवर धडकली..

35 जण जखमी तर 3 गंभीर...

 बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर – धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र.56 वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्या जवळ रात्री 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून या अपघातात जवळपास 35 भाविक जखमी तर 3 गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे हे विभागीय गस्तीवर असतांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व वडनेर भोलजी जवळच्या फिरोज ढाबा येथील मुस्लिम बांधव त्यांच्या मदतीला धावून आले व सर्वांनी मिळून तात्काळ जखमींना उपचारासाठी मलकपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर 10 जखमीना पुढील उपचारासाठी बुलडाणा रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. हे भाविक आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक, शिर्डीला देवदर्शानासाठी जात असताना उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स ने मागून जोरदार धडक दिली, यात 35 जण जखमी तर 3 जणांची प्रकृती गंभीर असून जखमींवर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. भाविकांना घेऊन बस हैदराबाद कुंनेर वरून शिर्डी कडे जात होती. 3 दिवसा अगोदर देखील याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्यप्रदेश परिवहनची बस व विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन 3 जण ठार तर 18 जण जखमी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!