जळगांव जामोदबुलढाणाविदर्भ

सुनगांव येथील वेदांत कपले ची एमबीबीएस कॉलेज वेदांता इन्स्टिट्यूट.. पालघरला निवड…

बुलढाणा जिह्यात, जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील वेदांत कपले ची एमबीबीएस प्रवेशासाठी, पात्रता परिक्षेत चांगले मार्क्स मिळवुन पास झाल्याने वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर ठाणे येथे निवड झाली. त्याच्या या निवडीने सुनगांव येथील नागरिकांनी आनंद व्यक्त करत, वेदांत व त्याच्या पालकांना शुभेच्छा दिल्या.

वेदांत कपले याने बारावीचे शिक्षण जळगांव जामोद येथील, सातपुडा सायन्स कॉलेज, जळगांव जामोद.. येथे पूर्ण केले. यावर्षी नीट परीक्षेच्या निकालानंतर बहुमानाच्या समजल्या जाणाऱ्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. नुकत्याच मेरिट लिस्ट नुसार जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये सुनगांव येथील वेदांत कपले याला एमबीबीएस पात्र प्रवेशासाठी परीक्षेमध्ये ५८२ गुण घेऊन त्याचा नंबर तिसऱ्या राऊंडला लागला, या अगोदर त्याचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ व्हेटेनरी नागपूर ला पण लागलेला आहे. वेदांत कपले हा सुनगांव येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टर प्रल्हाद कपले यांचा मुलगा असून वेदांत कपले याच्या एमबीबीएस प्रवेश पात्र झाल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, तो त्याला मिळालेल्या ह्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षक यांना देतो..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!