खामगांवबुलढाणाविदर्भ

खामगावात..डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू..झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी सुरु..

छातीत दुखत असल्याने खामगाव येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वेळेवर उपचार न केल्यामुळे या युवाकाचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरवर कारवाईची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

खामगावातील चांदमारी येथील जगदीश राजू गुजर वय 30 याला पोट व छातीमध्ये दुखणे सुरु झाल्याने त्याला खामगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. परंतु तेथे उपस्थित डॉक्टरांनी रुग्णाची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पर्यायाने खाजगी रुग्णालयांमध्ये जावे लागले. यावेळी खाजगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी पेशंटला मेजर अटॅक आला असल्याचे सांगून त्वरित भरती करण्याचा सल्ला देऊन उपचारासाठी पैसे जमा करण्याचे सांगितले. परिणामी जगदीश गुजर यांच्या कुटुंबाकडे पैसे नसल्याने त्यांनी पुन्हा खाजगी दवाखाण्यातून रुग्णाला सामान्य रुग्णालयांमध्ये भरती केले. परंतु उपचाराला विलंब झाला..सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून सामान्य रुग्णालयातील हजर असलेल्या डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्यामुळेच, युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कर्तव्यावर असलेल्या आणि उपचारासाठी टाळाटाळ करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली. यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांकडे कारवाईबाबत लेखी तक्रार दिली आहे. झालेले प्रकरण खूप गंभीर आहे, तक्रार दाखल होताच समिती नेमण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!