आरोग्यमहाराष्ट्र

प्रतिबंधित गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या आरोपींना विविध ठिकाणाहून अटक..

जालना..स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

जालना शहरामध्ये 6 सप्टेंबरला प्रतिबंधीत घटक असलेल्या तसेच अवैधरित्या गर्भपात व कामवासना उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा साठा मिळून आल्याने आरोपी अल्तमश शेख निसार शेख, संतोष बालासाहेब जाधव, राहुल भागाजी गायकवाड, उद्धव शिवाजी पटारे यांच्याकडे विविध कंपन्याच्या एकूण 8,11,288 रुपयाच्या गोळ्या आढळल्याने त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 07 सप्टेंबर रोजी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीमध्ये त्यांनी सदरचा मुद्देमाल अकोला येथील आरोपी सागर गुणवंतराव आठवले याच्या मार्फत मागवला असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे नंतर पोलीसांनी त्याला देखील ताब्यात घेतले आहे. आरोपी सागर आठवले याच्या चौकशी दरम्यान त्याने वरील मुद्देमाल अमरावती येथील कपिल किसनलाल साहु याच्याकडून घेतला असल्याचे सांगितल्याने आरोपी कपिल साहु याला देखील पोलिसांनी अटक केले, त्याच्याकडून 87 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी कपिल साहु याच्या चौकशीमध्ये त्याने हा मुददेमाल आरोपी कृष्णा युवराज पहाडे जो मध्यप्रदेश येथे राहणारा आहे त्याच्याकडुन मागवला असल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी आरोपी कृष्णा पहाडे याला मध्यप्रदेश मधून 15 सप्टेंबरला अटक केली. या आरोपी कृष्णा पहाडे याच्या चौकशीमध्ये या प्रकरणात इतर राज्यातील काही आरोपी निष्पन्न झाले असून, मुख्य पुरवठादारापर्यंत पोहचण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील तपास सुरु असल्याची माहिती जालना पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!