Uncategorizedजळगांव जामोदबुलढाणा

सुनगांव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती गठीत..

अध्यक्षपदी किशोर धुळे तर उपाध्यक्षपदी संगीताताई राजपूत

बुलढाणा जिल्ह्यातील, जळगांव जामोद तालुक्यात..सूनगांव जिल्हा परिषद शाळा समितीची निवड शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे दिनांक 14 तारखेला पार पडली, त्यामध्ये किशोर शेषराव धुळे हे अध्यक्षपदी तर संगीता आकाशसिंह राजपूत यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली व सदस्यपदी मुस्ताक शेख इसा, नदीम बलदार तडवी, मीना संतोष पाटील, सीमा सुधाकर दांडगे, प्रतिभाताई शेषराव नानग्दे, जबनुर राजू तडवी, संतोष सखाराम कापरे, अखिल नवसखा तडवी व  परीपत्रकाप्रमाणे सदस्यपदी बालरोग तज्ञ व ग्रामपंचायत सदस्य आणि एक उच्चशिक्षित शिक्षक यांची निवड केल्या जाईल अशी 13 सदस्यांची ही समिती असणार आहे. यावेळी सूनगांव येथील सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य माजी शाळा समिती अध्यक्ष व माजी सदस्य व शिक्षक वृंद आणि पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत व्यवस्थापन समितीची निवड शांततेत पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!