
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगांव जामोद..शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी दि. ८/८/२०२४ रोजी उपवनसंरक्षक अधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले होते की..जळगांव जामोद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेंढी चराई तसेच अवैध वृक्षतोड होत असल्याने, सातपुडा पर्वता मधील काही वनस्पती नष्ट होत आहेत, तसेच जळगांव जामोद तालुका अंतर्गत येत असलेल्या सातपुडा पर्वतामध्ये नवीन वृक्ष लागवड झालेली असून मेंढी चराई मुळे नवीन झाडांचे रोपटे नष्ट होत आहेत. यासंदर्भात तोंडी माहिती देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी कोणती दखल घेत नाहीत तरी याची चौकशी आपण करावी, तसेच जळगांव जामोद तालुक्यातील आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले दिसून येत आहे. तसेच आरामशीनवर सर्रास अवैध आडजात लाकूड कटाई चालू आहे, तसेच रन्दा मशीनवर सुद्धा विनापरवाना कटलेल्या लाकडाचेच काम चालू आहे, तसेच मध्यरात्रीच्या वेळी अकोट, बावनबीर माळेगाव, तेल्हारा, चांगेफळ, जळगांव जामोद, या सर्व ठिकाणच्या आरा मशीन वरून अवैध्य कटाई केलेले आडजात लाकूड जिगाव टाकळी प्रकल्पामध्ये धाबे बनविण्याकरता ट्रक भरून नेले जाते. लाकडाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. तसेच जळगांव जामोद बुऱ्हानपूर रोडवरील वनविभागाच्या नाक्यावरून मध्य प्रदेशामध्ये सुद्धा ट्रक भरून अवैद्य आडजात लाकूड मध्यरात्रीच्या वेळी पाठविल्या जातात. या सर्व बाबींची चौकशी करून कार्यवाही करावी. यांच्यावरती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १४ ऑगस्ट पासून आपल्या कार्यालयाच्या समोर, गांधीगिरी मार्गाने उपोषण करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते, मात्र दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे मनसे शहराध्यक्ष नागेश किसन भटकर यांनी उपोषणास सुरुवात केली आहे.



