राजकीयराष्ट्रीय

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ह्यांचे..राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) बाबत मोठ वक्तव्य..!

सुरवातीला.. भाजपला संघाची गरज होती, आता आम्ही सक्षम झालो..जेपी नड्डा

नवी दिल्ली :- सुरुवातीला भाजपला संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम झालो आहोत..! भाजप स्वतःच्या बळावर चालते. संघ ही वैचारिक आघाडी आहे, असे विधान भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष..जेपी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जे.पी. नड्डा म्हणाले..माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असताना, भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. त्यावेळी भाजपची क्षमता कमी होती. आता आमची क्षमता वाढली आहे. आम्ही आता आधीपेक्षा सक्षम झालो आहोत. भाजप आता स्वतःच स्वतःला चालवू शकतो. भाजप आता मोठा झाला आहे. या पक्षातील नेते कर्तव्य आणि भूमिका निभावत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामजिक संघटना आहे. तर भाजप हा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ वैचारिक पातळीवर काम करते, असेही नड्डा ह्यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!