जळगांव जामोदबुलढाणाविदर्भ

जय शिवराय..जगदंबा उत्सव मंडळाने..रेखाटला मनोहारी देखावा..

बुलढाणा जिल्ह्यात, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील जय शिवराय, जगदंबा उत्सव मंडळ यांच्यामार्फत 16 ऑक्टोंबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जगदंबा मातेची स्थापना केली आहे. सुनगांव येथील आठवडी बाजारामध्ये या मंडळाच्या सदस्यानी जगदंबा मातेची स्थापना ही ग्रामीण भागातील जीवनावर आधारित देखाव्यांमध्ये तंतोतंत सुंदर अशा मनोहारी दृश्यामध्ये केली आहे. जगदंबा उत्सव मंडळ हे नेहमीच सुनगांव येथील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते, जगदंबा मातेचा उत्सव हा सुनगांव येथे फार मोठ्या उत्साहात पार पाडल्या जातो. दिनांक 16 कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जगदंबा मातेची स्थापना केली जाते व 17 दिवस हा उत्साह मोठ्या थाटामाटाने चालतो, भाऊबीजेच्या दिवशी मातेची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून विसर्जन केल्या जाते. सकाळी आठ वाजता व संध्याकाळी आठ वाजता मातेची आरती ही टाळ मृदंग व वाद्याच्या गजरात मोठ्या थाटामाटात येथील भाविक एकत्र सहभागी होऊन करतात, सुनगांव येथे रेखाटलेल्या ह्या मनोहारी ग्रामीण पारंपारिक देखाव्याला भेट देण्यासाठी व त्याचा आनंद घेण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होत आहे. जय शिवराय जगदंबा उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश वसुले, उपाध्यक्ष गजानन कापरे, कोषाध्यक्ष आशिष कपले, व्यवस्थापक शुभम कापरे, सदस्य रुपेश प्रल्हाद ढगे, वैभव पुंडलिक वसुले, हर्षदीप परशराम कपले, रवी मधुकर घोलप, अतुल सखाराम ढगे, मोहन भिका कापरे इत्यादींनी हा देखावा रेखाटण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!