जळगांव जामोदबुलढाणाविदर्भ

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात..पोषण आहार कार्यक्रम..

आज दिनांक 25 /10 /2024 रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात 16 ऑक्टोबर राष्ट्रीय पोषण आहार दिनानिमित्त विविध अन्न घटकांनी समृद्ध स्वादिष्ट व पोषक अशा विविध प्रकारांच्या डिशचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकूण सहा अन्नघटके जसे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध्ये, खनिजे, जीवनसत्व, पाणी, उष्मांक या अन्न घटकांनी समृद्ध अशा पदार्थाचे आयोजन केले. तसेच यावेळी प्रांतीय आहाराचे सुद्धा आयोजन करण्यात आले, यामध्ये दक्षिणात्य इडली सांबार, बंगाली मिठाई गुलाबजाम, गुजरातचा ढोकळा, महाराष्ट्रीयन पदार्थ करंजी हे प्रांतीय आहार ठेवण्यात आले व त्याचे उत्तमरीत्या सादरीकरण विद्यार्थिनींनी केले ‍. अन्नघटकाअंर्तगत कॅलरी युक्त साबुदाणा वडा, आलू पराठा, लोहयुक्त शेंगदाणा चिक्की, तिळाची चिक्की, अळूच्या पानांच्या वड्या, प्रथिने युक्त इडली फ्राय, मिश्र कडधान्याची उसळ, कार्बोदकेयुक्त मिश्र भाकरी, जीवनसत्वयुक्त पालक मेथी पराठा यांचा डिश डेकोरेशन मध्ये समावेश करण्यात आला.

याशिवाय संग्रहाचे पदार्थ आवळा मुरब्बा, मिरची लोणचे, लिंबाचे लोणचे यांचेही प्रात्यक्षिक ठेवण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुलींना पोषक घटकांची माहिती मिळावी तसेच आवड व जाणीव जागृती व्हावी या दृष्टीने तसेच मुलींच्या सुप्तगुणांना वाव मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई, अधीक्षक संजय गाडेकर, इंग्रजी विभाग प्रमुख गिरीश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष्यांनी मुलींचे कौतुक केले तसेच पोषण आहाराचा दर्जा कायम ठेवण्यासाठी कुटुंब व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या व यांचे ज्ञान निश्चितच तुमच्या भावी आयुष्यात उपयोगी पडेल असे आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.
या कार्यक्रमात बीए भाग दोन व भाग दोन तीनच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ. अर्चना जोशी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गृह अर्थशास्त्राच्या सौ. मानसी कुलकर्णी, हर्षद धर्मै आणि गृह अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!