
दि. 20 डिसेंबर 2024 रोजी जळगांव जामोद तालुक्यामधे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बुलढाणा मनोजकुमार ढगे यांचा दौरा आयोजित होता. दौऱ्यादरम्यान त्यांनी कृषि विज्ञान केंद्र जळगांव जामोद येथे आयोजित शास्त्रोक्त सल्लागार समिती सभेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक परिस्थिती, पिकांची उत्पादकता व कृषि विज्ञान केंद्रानी येत्या वर्षात राबवायच्या तांत्रिक बाबी बाबत मार्गदर्शन केले, यावेळी कृषि विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विकास जाधव, उमाळे, गाभणे व इतर सर्व शास्त्रज्ञ, शेतकरी इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर तालुक्यातील चालठाणा, सुनगांव, जामोद अशा विविध ठिकाणी जिल्हा कृषीअधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी भेट दिली असता,

चालठाण्यातील भास्कर धुरडे, सुभाष धुरडे, अनंता मिसाळ यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लागवड केलेले संत्रा फळबाग तसेच पानपिंपरी, सफेद मुसळी या औषधी वनस्पती पिकांचे लागवडी पासून ते काढणी व विक्री पर्यंत सर्व बाबीं विषयी माहिती दिली, तसेच सूनगांवातील बालकराम पाटील यांच्या शेतात जाऊन म. ग्रा. रोहयो योजनेअंतर्गत लागवड केलेल्या केळी तसेच संत्रा पिकाचे उत्पादनासोबतच स्वतः प्रक्रिया करून विक्री पर्यंतचे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, याविषयी विशेष मार्गदर्शन केले. तसेच विजय वंडाळे यांच्या शेतातील जैविक निविष्ठा निर्मिती प्रयोगशाळेला भेट दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी वाकोडे, मंडळ कृषि अधिकारी पाटील मॅडम, कृषी पर्यवेक्षक दंदाले, शिंदे, कृषी सहाय्यक शेकोकार, गव्हाणे, जागृत, शेळके, कृषी मित्र मोहन सिंह राजपूत तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.



