जळगांव जामोदबुलढाणा

सुनगांव..जिल्हा परिषद शाळेच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा संपन्न..

बुलढाणा जिल्ह्यात, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक ११ जानेवारी रोजी पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर धुळे, सुनगांव तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत, ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडे, माजी शाळा समिती अध्यक्ष अंबडकार, शाळा समिती उपाध्यक्षा संगीता राजपूत यांची उपस्थिती होती. यावेळी सुनगाव येथील पत्रकार राजकुमार भड, गजानन सोनटक्के, अनिल भगत, अश्विन राजपूत, गजानन खिरोडकार, शिवदास सोनोने, गणेश भड या पत्रकार बांधवांचा जिल्हा परिषद शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व पेन देत सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता क्षिरसागर यांनी केले तर आभार खिरोडकर यांनी मानले. यावेळी पत्रकार सन्मान सोहळा जिल्हा परिषद व उर्दू प्राथमिक शाळेने आयोजित करून आमच्यासारख्या पत्रकारांना कृतज्ञ केले याबद्दल शाळेचे आभार पत्रकार अश्विन राजपूत यांनी मानले.. या पत्रकार सन्मान सोहळ्याला जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे, उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर, बेग, प्रदीप वाकेकर, अंबडकार, अस्मिता क्षिरसागर, ह्यांच्यासह शिक्षिका.. साबे, बोंबटकार, गवई, उमाळे, इत्यादींसह..कर्मचारी मनोहर वानखडे राजु अंदुरकार तसेच बहुसंख्य शाळेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!