
बुलढाणा जिल्ह्यात, जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक १२ जानेवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेचे आवारात मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच आपल्या खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल शाळेच्या परिसरात लावले होते. यामध्ये पापड, मटकी, चवळी उसळ, इडली, पोहे, कुरकुरे, पाणीपुरी, बर्फी, चणे उसळ, मिसळ, सोनपापडी यासारखे बरेच खाद्यपदार्थ विक्रीस आणले होते. यावेळी बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शाळा समिती अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजकुमार भड, गजानन खिरोडकार, गणेश भड, गजानन सोनटक्के, अश्विन राजपुत, शिवदास सोनोने, अनिल भगत, तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत, ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडे, माजी शाळा समिती अध्यक्ष अंबडकार, शाळा समिती उपाध्यक्ष संगीता राजपुत यांची उपस्थिती होती. यावेळी शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे यांच्या हस्ते फीत कापून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख मान्यवर व गावातील नागरिकांनी.. विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारला, तसेच शाळेच्या शिक्षिका व शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी आणलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला..

आणि विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या पाककृतीचे व विविध खाद्यपदार्थांचे कौतुक केले.. यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे, उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर, बेग, प्रदीप वाकेकर, अंबडकार, अस्मिता क्षिरसागर, यांसह शिक्षिका..साबे, बोंबटकार, गवई, उमाळे, इत्यादींसह कर्मचारी मनोहर वानखडे राजु अंदुरकार तसेच बहुसंख्य शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.



