
वीज दरवाढीच्या विरोधात आज सोमवारी चंद्रपुरात विविध संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गांधी चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. चंद्रपूर जिल्हा हा विज उत्पादन करणारा जिल्हा आहे. त्यासाठी येथे लागणारा कोळसा व पाणी याच शहरातून पुरविल्या जाते.

इथे असणाऱ्या सी.टी.पी.एस मुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच जुन २०२४ या महिण्यामध्ये विद्युत बिलात प्रति युनिट मध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असुन, या मुळे चंद्रपूर शहरातील सर्वसामान्य नागरीकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. वाढवलेली विद्युत दरवाढ कमी करण्यात यावी अन्यथा या पेक्षा ही अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी आंदोलक आशिष मशिरकर यांनी दिला. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.



