जळगांव जामोदबुलढाणाशैक्षणिक

बुलढाणा जिल्ह्यातील.. जळगांव जामोद येथे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात गीता जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन..

दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयच्या ग्रंथालयात गीता जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने, एक विशेष ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव मिलिंद जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. डाबरे उपस्थित होते.
भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांवरील मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेतील विविध ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले. याशिवाय, भारतीय ज्ञान व्यवस्थेशी संबंधित वेद, उपनिषद, पुराणे, रामायण आणि महाभारत यांचे ग्रंथ देखील प्रदर्शित करण्यात आले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. ग्रंथालय कर्मचारी यांनी या प्रदर्शनासाठी विशेष मेहनत घेतली. गीता जयंती निमित्त आयोजित केलेले हे ग्रंथप्रदर्शन विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि ज्ञानव्यवस्थेची ओळख करून देण्याचे एक उत्तम माध्यम ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!