जळगांव जामोदबुलढाणा

घरकुल यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी, नागरिकांचे सुनगाव ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण..

10 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घरकुल यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी सुनगाव येथील मोहन सिंह राजपूत, सुरेश जोशी, अरुण दुबे या नागरिकांनी सुनगाव ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु यामध्ये सिस्टीम अंतर्गत काही लाभार्थ्यांची नावे ही रद्द करण्यात आली होती. परंतु रद्द करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची घरकुल झाली व या रद्द झालेल्या यादीमध्ये आमचे नाव समाविष्ट असून सुद्धा आमचे घरकुल अद्याप पर्यंत मंजूर झाले नाही, याविषयी ग्रामसेवक ग्रामपंचायत सुनगांव यांना विचारणा केली असता, त्यांनी उपोषणकर्त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली असे सांगितले म्हणून, उपोषणकर्त्यांनी दिनांक 17 जानेवारी रोजी घरकुल यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता, परंतु अद्याप पर्यंत नाव समाविष्ट न केल्याने या उपोषणकर्त्यांनी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!