
बुलढाणा जिल्हात जळगांव जामोद तालुक्यातील, सुनगांव ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड नंबर एक मध्ये, ग्रामपंचायतने पावसाळ्या अगोदर सफाई कामगार असून सुद्धा तसेच नागरिकांनी सरपंच यांना वेळोवेळी सांगून सुद्धा नाल्या साफसफाई केलेल्या नाही. त्यामुळे काल 15 जून रोजी झालेल्या पावसामुळे, नाल्या ह्या केरकचऱ्याने तुडुंब भरून ब्लॉक झाल्या व परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांच्या घरातील खाण्यापिण्याच्या वस्तू भिजल्या. सरपंच व सचिव यांना वेळोवेळी सांगून सुद्धा व लेखी अर्ज देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची नालिसफाई व दुरुस्ती या वार्ड नंबर एक मध्ये केलेली नाही. या वार्ड नंबर एक मध्ये फार दयनीय अवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी पावसाळ्यात सुद्धा कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. परिणामी पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे गुडघाभर पाणी घरात झाले.

त्यामुळे वॉर्ड नंबर एक मधील नागरिकांनी एकत्रित येत, संतापून ग्रामपंचायत कार्यालयावर डफळे बजाव मोर्चा काढून, सूनगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चिखल फेकण्यात आला. यावेळी संजय निमकर्डे, मंगेश गवइ, सोमनाथ गवइ, व महिला उपस्थित होत्या. तरी या बाबतीत ग्रामपंचायतला निवेदन देनार असल्याचे या नागरिकांनी म्हटले आहे. नाल्या साफसफाई व दुरुस्ती न झाल्यास ग्रामपंचायतला नागरिकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागणार असल्याचे, तसेच होणाऱ्या परिणामास स्वतः ग्रामपंचायत जबाबदार राहील असे वार्ड नंबर एक मधील नागरिकांनी म्हटले आहे.



