
बुलढाणा जिल्ह्यात..जळगांव जामोद तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती पैकी एक असलेल्या सुनगांवचा वीजपुरवठा गेल्या कित्येक वर्षापासून वारंवार खंडित होतो. वारंवार वीज पुरवठा खंडित होत, असल्यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे. येथील नागरिकांनी ह्या आधी सुध्दा.. निवेदन दिले, मोर्चा काढला, उपोषण केले, परंतु अद्यापही गावाची वीज समस्या जैसे थे आहे. याचे कारण सुनगांव गावठाण फिडर हे उमापूर सब स्टेशन वरून जोडण्यात आलेले आहे. शेतातून येणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे वेळोवेळी फॉल्ट होऊन गावाची लाईट बंद असते. कधी दिवसभर तर कधी रात्रभर वीज पुरवठा खंडित झालेला असतो. लाईनमला सुध्दा फॉल्ट शोधून काढायला उशीर लागतो. उमापूर सब स्टेशन पासून सुनगांव गावठाण चे अंतर जवळपास ११ कि.मी.आहे. त्यामुळे सुनगांव गावठाण ला होणारा विजपुरवठा हा शनि मंदिर सबस्टेशन वरून जोडण्यात यावा, असे केल्यास सुनगांव गावठाण चा वीज पुरवठा सुरळीत चालू राहील, व फॉल्ट झाल्यास लवकर निघेल. यासाठी गावकऱ्यांनी अगोदरही महावितरण ला दोन वर्षांपूर्वी निवेदन दिले होते, तसेच आमरण उपोषण मांडले होते. त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते, त्यावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही.

तरी लवकरात लवकर निर्णय घेऊन सुनगांव गावठाण चा वीज पुरवठा शनी मंदिर सब स्टेशन वरून जोडण्यात यावा..अन्यथा दिनांक २० जुन रोजी सुनगांव येथील गावकऱ्यांकडून महावितरण कार्यालयावर खूट.. मोर्चा काढण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन सुनगांव गावकऱ्यांच्या वतीने दिनांक १० जुन रोजी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना, तसेच महावितरण कार्यालय जळगांव जामोद..येथील चौभारेवाला यांच्या खाली खुर्चिला व पोलीस स्टेशनला देण्यात आले. दिलेल्या निवेदनावर सुनगांव चे सरपंच रामेश्वर अंबडकार, महादेव धुर्डे, कृषिमित्र मोहनसिंह राजपुत, रमेश वंडाळे, गणेश वसुले, रामधन कतोरे, गणेश दामधर, पांडुरंग कोथळकार, रामेश्वर ठोसर, मधुकर येउल, प्रमोद वानखडे, संतोष भगत, श्रीराम नानग्दे, गोपाल धुर्डे, वसंता भगत, गजानन ढगे, अमोल उमाळे, अशोक वसुलकार, सिताराम ताडे, वसंता कापरे, मधुकर वानखडे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



