
बुलढाणा जिल्ह्यात…भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग व तालुका, शहर काँग्रेस कमिटी जळगाव जामोद यांचे वतीने जळगाव जामोद तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने झालेल्या पिक नुकसानीचा, पंचनामा झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तात्काळ प्रदर्शित करून भरपाई ची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बाबत व पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळणे बाबत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जळगाव जामोद तालुक्या मध्ये २०२३-२४ मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रब्बी शेत पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या वतीने केलेल्या पाठपुराव्या नंतर, सदर पिक नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील विविध मंडळातील मुखत्वे जामोद व सुनगाव मंडळातील ७,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत असे निवेदनात नमुद आहे.


यावेळी बोलतांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी सांगितले की निराधार व अपंग यांचे तीन महिन्यापासून प्रलंबित असलेले अनुदान सात दिवसाच्या आत जमा करण्याचे आश्वासन मा. तहसीलदार यांनी दिले आहे.
१० दिवसांच्या आत सदर याद्या प्रदर्शित न झाल्यास व तहसिल कार्यालयाच्या दिरंगाई मुळे एक ही शेतकरी मदती पासुन वंचित राहिल्यास, उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा परखड इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग चे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी दिला.
- महाराष्ट्र शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसानभरपाई बाबत घोषणा केलेली आहे. सदर पिक नुकसानीची रक्कम प्राप्त करण्या करिता शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालयाद्वारे प्रदर्शित केलेल्या यादी मधील क्रमांक भरणे आवश्यक आहे.
परंतु जळगांव जामोद तहसिल कार्यालयाने अजून पर्यंत सदर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रदर्शित केलेली नाही, परिणामी तालुक्यातील शेतकरी शासनाने घोषित केलेल्या त्यांच्या हक्काच्या मदती पासुन वंचित राहू शकतात.
तरी तहसिल कार्यालाया मार्फत तात्काळ सदर शेतकऱ्यांची यादी प्रदर्शित करावी व शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई ची रक्कम जमा करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानास पूर्णपणे तहसिल कार्यालय व तहसीलदार म्हणून आपण जबाबदार असाल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला आहे त्यांना पीकविमा मिळणे करिता, आवश्यक कार्यवाही व्हावी.
१० दिवसांच्या आत सदर याद्या प्रदर्शित न झाल्यास व तहसिल कार्यालयाच्या दिरंगाई मुळे एक ही शेतकरी मदती पासुन वंचित राहिल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व प्रशासन म्हणून याची पूर्ण जबाबदारी आपली राहिल.
असे निवेदनात नमुद आहे.
यावेळी
डॉ. स्वातीताई वाकेकार, ज्योतीताई ढोकणे, अविनाश उमरकर, अर्जुन घोलप, एम. आसिफ इक्बाल, समाधान दामधर, प्रविण भोपळे, श्रीकृष्ण केदार, ऍड. भालेराव, प्रमोद अढाव, ऍड संदिप मानकर, जुनेद शेख, अनिल इंगळे, नितीन जाधव, शेख नासीर, प्रमोद तीतरे, अंबादास सुशीर, अब्दुल जहीर, ज्ञानेश्वर वानखेडे, शंकर म्हस्के सह बहुसंख्य शेतकरी उपस्थीत होते.



