बुलढाणाविदर्भ

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगांव जामोद येथे आंतर..महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन..

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व जळगांव शिक्षण मंडळ द्वारा संचलित श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगांव जामोद जिल्हा बुलढाणा, यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय पुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे सामने दिनांक 4/ 10/ 2024 पासून ते दिनांक 7/10/2024 या चार दिवसांमध्ये होणार आहे. यामध्ये संत गाडगेबाबा विद्यालयात एकूण 35 महाविद्यालयीन संघाचा समावेश असणार आहे. अमरावती विभागात चौथा मानांकन असलेली चमू श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग शेगांव ही टीम सुद्धा सहभाग घेत आहे. तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.

स्पर्धा आयोजनाकरिता अकोला येथील राष्ट्रीय स्तरावरचे पंच, सामन्याच्या आयोजकांमध्ये येणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश मायी, अनुप पुराणिक, मिलिंद जोशी ह्यांची उपस्थिती ह्यावेळी असणार आहे. या सामन्याचे उद्घाटन 4 /10/ 2024 ला सकाळी नऊ वाजता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर च्या मैदानावर होणार आहे. हे सामने बाद पद्धतीने खेळवले जाणार असून, प्रथम विजेता व उपविजेता यांना जळगाव शिक्षण मंडळातर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन डॉक्टर प्रवीण डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एस के के कॉलेज क्लब चे अमोल क्षीरसागर, युगांत क्षीरसागर, प्रणित वाघ, भूषण खेडेकर, ईश्वर येऊल, अमोल भगत यांचे सहकार्य लागणार आहे. अशी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे, ह्याचे सर्व दूर कौतुक होत आहे. तरी क्रीडा प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!