जळगांव जामोदबुलढाणा

शेतीच्या वादातून पत्नीस मारहाण झाल्याचे ऐकल्याने पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू…सुनगांव येथील घटना..

जळगांव जामोद पोलिस स्टेशन हद्दीतील सुनगाव या गावातील रहिवाशी असलेले अशोक शंकर ढगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकोला, येथील ओझोन हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाल्याची घटना दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी दुपारच्या दरम्यान घडली.. सविस्तर असे की सुनगाव येथील शेतकरी अशोक शंकर ढगे यांचे सुनगाव शेत शिवारातील सुनगाव भाग एक मध्ये गट नंबर १७९ शेत असून त्या शेतीचा वाद गेल्या कित्येक महिन्यापासून चालू असून सध्या प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. दिनांक २ एप्रिलच्या सकाळी अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे व मुलगा प्रतीक ढगे शेतामध्ये संत्र्याच्या झाडाला पाणी देण्यासाठी गेले होते यावेळी प्रतीक ढगे व त्याची आई संत्र्याच्या झाडांच्या आळ्या मधील गवत कापून त्यांच्या शेताच्या धुर्‍यावर टाकत होते. त्यावेळी वसंता लक्ष्मण ताडे यांनी शेताचे धुर्‍यावर गवत का टाकले असे म्हणून प्रतीक ढगे यास काठीने मारहाण केली यावेळी त्याची आई कुसुम ढगे मुलाला वाचवण्यासाठी आली असता वसंत ताडे यांनी अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे यांचे केस पकडून ओढत नेले तसेच पायावर मांडीवर पाठीवर हातावर काठीने मारहाण केली तसेच शिवीगाळही केली व त्यांच्या अंगावर बसून गळा घोटण्याचा प्रयत्न केला व दम दिला की जर शेताच्या धुऱ्यावर गवत टाकले तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला हात पाय तोडून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिस स्टेशनला मृतक अशोक ढगे यांचा मुलगा प्रतीक यांने पोलिसांना दिली. तसेच गजानन लक्ष्मण ताडे, पवन वसंत ताडे यांनी सुद्धा शिवीगाळ करून जीवे मारणे धमकी दिल्याची माहिती प्रतीक ढगे यांनी पोलिसांना दिली. मारहाण झाल्याच्या घटनेची माहिती कोणीतरी अशोक ढगे यांना दूरध्वनी वरून सांगितल्याने रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराचा झटका येऊन अशोक शंकर ढगे यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस वसंत ताडे हे जबाबदार असल्याची तक्रार मुलगा प्रतिक ढगे याने जळगांव जामोद पोलीस स्टेशनला दिली. त्याच्या तक्रारीवरून वसंत ताडे, गजानन ताडे, पवन ताडे, योगेश ताडे यांच्या विरोधात अप क्रमांक २०३/२०२५ कलम ११८(१)११५(२),३५१(३),३५२,३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९२(अ),९२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक इरफान शेख व संदीप रिंढे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!