बुलढाणाविदर्भ

जिल्ह्यातील महिला सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांचे महत्वाचे पाऊल..

एकाच क्लिकवर मिळणार महिलेला मदत..

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता एकाच क्लिकवर महिलांना तातडीची मदत मिळणार आहे. महिला आपत्कालीन मदत व मार्गदर्शन लिंकचे एसपी विश्व पानसरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. जिल्हा पोलिस दलाकडून एक लिंक महिला व जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना या लिंकवर क्लिक करून तक्रार केल्यास पोलिस नियंत्रण कक्ष व नजिकच्या पोलिस स्टेशन मध्ये एक सायरन वाजेल, त्यानंतर संबंधित यंत्रणा तक्रारदार महिलेच्या मदतीच्या दृष्टीने तातडीने पाऊल उचलेल. आवश्यकता भासल्यास पोलिसांचे एक पथक महिलांच्या मदतीसाठी घटनास्थळावर पोहोचणार आहे. सदर लिंक जिल्ह्यातील महिलांनी आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून त्यावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!