जळगांव जामोदबुलढाणाराजकीय

बुलढाणा लोकसभा मतदार संघात, प्रतापराव जाधव यांच्या विजयाचा..चौकार..

जळगांव जामोद। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी याआधी तीन वेळा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली होती, आणि आता चौथ्यांदा निवडून येऊन विजयाचा चौकार मारल्याची भावना, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत डिजेवरील गाण्यांवर नाचत..ठेका धरत, मोठ्या प्रमाणावर फटाके फोडून तसेच गुलाल उधळून एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा जल्लोष केला.

यावेळी बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, गजानन सरोदे, अभिमन्यु भगत, अनिल जयस्वाल, कैलास पाटील, सुनीता म्हसाळ, परीक्षित ठाकरे, सरपंच दीपक वाघ, उमेश येऊल, लता तायडे, राणेबाई, आरती पलन, द्रौपदी हागे, सुनीता नानकदे, बाळू पाटील, निलेश शर्मा, पंकज देशमुख, रामा इंगळे..इत्यादींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!