धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करु नये या मागणीसाठी, आज बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. धनगर समाज हा धनगड या जमातीच्या नावाचा गैरफायदा घेत गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, उपोषण करुन धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करत आहे. मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जिआर काढण्याचे सांगत त्यांनी तमाम महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा असा निर्णय घेतला असून हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे.
Check Also
Close
-
दोन वर्ष अगोदर बनविलेला पूल पूर्वपरवानगी न घेता तोडलाDecember 10, 2025




