जळगांव जामोदबुलढाणाविदर्भ

सूनगांव ग्रामपंचायत ने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्राला दाखवली केराची टोपली…

बुलढाणा जिल्ह्यात..जळगांव जामोद तालुक्यातील सूनगांव हे ग्रामपंचायत साफसफाई कामांच्या दृष्टीने उदासीन दिसत असून, सुनगांव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सुनगांव येथे पहावयास मिळत आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबके साचलेली आहेत, त्यामध्ये डासांची उत्पत्ती झालेली आहे व ठीक ठिकाणी गवत वाढलेले आहे, त्यामुळे सुद्धा गावात डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यावर तन नाशक फवारणी करावी व गावात धूर फवारणी करावी गावात मच्छरांचे प्रमाण खूप वाढलेले असल्यामुळे डायरिया, मलेरिया कॉलरा, डेंग्यू इत्यादी प्राणघातक रोगांची लागण नागरिकांना होतांना दिसत आहे. ह्यावरुन असे दिसून येते की नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायत सूनगांवने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. मागील वर्षी ही ग्रामपंचायत कडून सुनगांव मध्ये धूर फवारणी करण्यात आली नाही. तालुक्यातील इतर ग्रामपंचायत मध्ये जवळपास धूर फवारणी झालेली आहे. त्यातच सतत वीस ते पंचवीस दिवस पाऊस चालू असताना, गावात पावसाचे पाणी साचून जागोजागी डबके तयार झाले आहेत. त्यामध्ये डासांची मोठी उत्पत्ती झालेली आहे, व यातूनच सुनगांव येथे पोटाचे विकार व तापीचे आजार या रोगांनी सुनगांव वासीयांना ग्रासले आहे. तरी पण सुनगांव ग्रामपंचायत कडून सुनगांव वासियांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या, मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.

गावांत पिण्याचे योग्य पाणी नसल्याची व धूर फवारणी केली नसल्याची बातमी प्रसारित होताच, सतत चालू असलेल्या पावसामुळे रोगास अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याने, वैद्यकारी अधिकारी यांनी खबरदारी घेऊन ग्रामपंचायतला, 30/7/2024 रोजी पत्र दिलेले आहे, त्या पत्रात साथ रोग उद्भवू नये ह्यासाठी, एकूण नऊ उपाय योजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायतला केलेल्या आहेत. परंतु पाच ते सहा दिवस उलटूनही ग्रामपंचायत प्रशासनाने यातील उपाययोजना किंवा मार्गदर्शन सुनगांव येथील नागरिकांना केलेच नाही व अश्याप्रकारे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्राला देखील केराची टोपली दाखविण्याचे काम सुनगांव ग्रामपंचायत ने केले असल्याची चर्चा सूनगांव येथील नागरिक करताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!