बुलढाणाविदर्भ

जन्मदिवशी रविकांत तुपकर करणार अन्नत्याग आंदोलन..

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा १३ मे रोजी जन्मदिवस आहे. तूपकरांचा वाढदिवस दरवर्षी अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतो. आपल्या क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यालयात तुपकर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. सगळ्यांना भेटत असतात. यंदा मात्र तुपकर आंदोलनात्मक पद्धत्तीने जन्मदिवस समर्पित करणार आहेत.ते चाहत्यांना भेटतील पण, कोणतेही बॅनर लावू नका, पुष्पगुच्छ आणू नका असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. जन्मदिवसाच्या दिवशी १३ मे रोजी मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ वाजे पर्यंत रविकांत तुपकर घराच्या अंगणात सहकुटुंब अन्नत्याग करणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह इतर मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला, त्यानंतर झालेल्या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. मात्र यात देखील काही जवानांसह सीमेवरील गावातील काही नागरिकांचा मृत्यू झाला. शहीद भारतीय जवानांसह नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी देखील तुपकर व त्यांचे कुटुंबीय एक दिवशीय उपवास करणार आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!