जळगांव जामोदबुलढाणा

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लाखोंचा ऐवज केला लंपास..सुनगांव येथील घटना..

बुलढाणा जिल्ह्यातील, जळगांव जामोद तालुक्यात चोरीचे सत्र थांबायचे नावच घेईना.. गेल्या कित्येक महिन्यापासून, जळगांव जामोद तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसाढवळ्या आसलगांव बाजार येथे सोने-चांदी विकण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी लुटले, मात्र घटना घडून बरेच दिवस उलटूनही पोलीसांना, त्या चोरट्यांचा शोध घेण्यात यश आले नाही व त्या सोने-चांदी व्यापाऱ्याला त्याचा, चोरट्यांनी लुटून नेलेला मुद्देमाल अद्याप परत मिळु शकला नाही.

त्यातच दिनांक १३ जानेवारी च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सुनगांव येथील, प्रल्हाद लक्ष्मण ढगे यांच्या बंद दरवाज्याचे कुलूप तोडून, लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. प्रल्हाद ढगे हे आपल्या परिवारासह घराला कुलूप लावून, जगदंबा माता यात्रेकरिता संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून, घरामध्ये प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे मिनी मंगळसूत्र १७ ग्रॅमचे, कानातील टॉप्स ०३ ग्रॅमचे, ०३ ग्रॅमची अंगठी, सोन्याचे ०३ ग्रॅम चे ओम, सोन्याचे डोरले, चांदीच्या तोरड्या, चांदीचे कडे, चांदीचा गोफ चोरून नेला असुन, चोरून नेलेल्या सोने व चांदीची किंमत जवळपास, ३ लाख रुपये असल्याचे समजते, चोरीची घटना सकाळी उघडकिस आल्याने, प्रल्हाद ढगे यांच्या घराकडे धाव घेत स्थानीक नागरिकांनी घटनेची माहिती यात्रेकरिता गेलेले प्रल्हाद ढगे यांना दिली. प्रल्हाद ढगे यांनी जळगांव जामोद पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिल्याने, पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम ३०५(A)३३१(३)३३१(४) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश माहोड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!